उदक शांती करताना गुरूजी गणपती पूजन व पुण्याहवाचन करतात. प्रधान पीठावरील कलशास गुग्गुळाने धुपवितात. मग ब्रह्मदेवाची स्थापना करतात. गुग्गुळाचा धूर पूर्ण घरात फिरवतात. वेदांचे मंत्र म्हणून पाणी अभिमंत्रित केले जाते.
उदक शांतीमध्ये तीन प्रकारे शुद्धीकरण प्रक्रिया होते. सर्वप्रथम १) गुग्गुळाचा धूर, त्यानंतर २) वेदमंत्रांची स्पंदने, नंतर ३) पाण्याने सिंचन करून केले जाणारे शुद्धीकरण.
यजमानांना अंघोळीलासुद्धा हे पाणी दिले जाते, जेणेकरून घरातील व परिवारातील नकारात्मक शक्तीचा पूर्णपणे नाश होतो.
वैदिक कर्मकांडात अनेक याग, अनुष्ठाने, व्रते व पूजा सांगितल्या आहेत. त्यातील काही प्रचलित असल्यामुळे माहीत असतात आणि काही प्रचलित नसल्याने माहिती नसतात. म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे .अजून खूप अनुष्ठाने आहेत. आपले सहकार्य व प्रेम यांच्या सहयोगाने तेही अल्पबुद्धीने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करीन.