वे.मु. अनंत पांडव गुरुजी

जन्म शांती

जीवन आरोग्यपूर्व व्हावे, सुखमय व्हावे, उर्वरीत जीवनात शांती मिळावी म्हणून प्राचीन ऋषीमुनींनी ५०व्या वयापासून १०० वयापर्यंत वेगवेगळ्या शांती
सांगितलेल्या आहेत. बाह्मण बोलावून शास्त्रोक्त शांती करून घ्यावी. ही शांती स्त्री किंवा पुरूष कोणाचीही करतात.

  • वयाच्या पन्नासाव्या वर्षी – वैष्णवशांती
  • वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी – वारूणी शांती
  • वयाच्या साठाव्या वर्षी – उग्ररथ शांती
  • वयाच्या पासष्टाव्या वर्षी – मृत्युंजय महारथी शांती
  • वयाच्या सत्तराव्या वर्षी – भौमरथी शांती
  • वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी – ऐंद्री शांती
  • वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतर – सहस्त्र चंद्रदर्शन शांती
  1. 1
    सहस्त्र चंद्र दर्शन

    सहस्त्र चंद्र दर्शन म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात किती पैर्णिमा पाहिल्या आहेत, म्हणजे किती पौर्णिमा होऊन गेल्या आहेत.

    तसा हिशोब करता ८०वर्षात दरसाल १२ प्रमाणे होतात ९६०, अधिक महिने येतात २७ म्हणजे त्या झाल्या २७ एकंदर झाल्या ९८७ तर १०००ला कमी पडत्तात १३ म्हणून ८१ वर्षे १ महिन्यानंतर सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा करावा.

    • वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी – रौद्री शांती
    • वयाच्या नव्वदाव्या वर्षी – कालस्वरूप रौद्री शांती
    • वयाच्या पंचाण्णव्या वर्षी – त्र्यंबक मृत्युंजय शांती
    • वयाच्या शंभराव्या वर्षी – र्यंबक महामृत्युंजय शांती

    Cart