वे.मु. अनंत पांडव गुरुजी

नवग्रह जप

१. सूर्य- ॐ ऱ्हां ऱ्हीं ऱ्हौं स: सूर्याय नम:
महत्त्व : कुंडलीमधील सूर्य ग्रहाची उत्तम स्थिती प्राप्तीकरिता जप व दान करावे. हवन करतेवेळेस शक्यतो रविवार तसेच हवनामध्ये रक्तचंदन अर्कसमिधा, तीळ आणि दही यांचा उपयोग करावा.

२. चंद्र- ॐ श्रां श्रीं श्रौं स: सोमाय नम:
महत्त्व : कुंडलीमधील चंद्र गहाच्या उत्तम स्थिती प्राप्ती करिता सोमवारी जप करून हवन करावे. हवन करतेवेळी तूप, पायस, दही, मध आणि पळसाच्या समिधा यांचा विशेष उपयोग करावा.

३. मंगळ- ॐ क्रां क्रीं क्रौं स: भौमाय नम:
महत्त्व : कुंडलीमधील मंगळ ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता मंगळवारी मंगळ ग्रहाचे हवन करावे. यामध्ये विशेषत: दही, मध, तूप, तीळ तसेच खैराच्या समिधांचा विशेष उपयोग करावा.

४. बुध : ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:
महत्त्व : कुंडलीमधील बुध ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता बुधवारी जप करून तूप, तीळ, आघाडा या वनस्पतींच्या समिधा वापरून हवन करावे.

५. गुरू : ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:
महत्त्व : कुंडलीमधील गुरूची उत्तम स्थिती प्राप्तीकरिता अथवा गोचर कृपेने चार, आठ, बारा या स्थानी गुरू असता गुरुवारी गुरूचा जप करून हवन करावे.
या हवनामध्ये विशेषत: पिंपळ वृक्षाच्या समिधा, मध, दही, पायस, तूप, जव आणि तीळ हे विशेष द्रव्य वापरून हवन करावे.

६. शुक्र: ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:
महत्त्व : कुंडलीमधील शुक्र ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता, उत्तम वैभवप्राप्तीकरिता शुक्रवारी जप करून हवन करावे. यामध्ये विशेषत: दही, मध, तीळ व औदुंबर या वृक्षाच्या समिधांचा हवनामध्ये उपयोग करावा.

७. शनी :ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:
महत्त्व : कुंडलीमधील शनी ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता तसेच साडेसाती पीडाशमन होण्याकरिता शनिवारी जप करून हवन करावे.
यामध्ये विशेषत: दही, मध, तूप, तीळ व शमी या वृक्षांच्या समिधांचा हवनामध्ये उपयोग करावा.

८. राहू : ॐ भ्रां भ्रीं भ्रौं स: राहवे नम:
महत्त्व : कुंडलीमधील राहू ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता रविवारी जप करून हवन करावे. हवनामध्ये विशेषत: पायस, तांदळाच्या साळी (लाह्या), तूप, मध व दूर्वा या समिधांचा उपयोग करावा.

९. केतू : ॐ स्त्रां स्त्रीं स्त्रौं स: केतवे नम:
महत्त्व : कुंडलीमधील केतू ग्रहाच्या उत्तम स्थिती प्राप्तीकरिता रविवारी केतूचा जप करून हवन करावे. यामध्ये विशेषत: कुश (दर्भ), पायस, तीळ, तूप यांचा उपयोग करावा.

    Cart