वे.मु. अनंत पांडव गुरुजी

मुंज

मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवित (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटूला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.

काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे.

  1. 1
    उपनयन म्हणजे काय ?

    गायत्री मंत्राचा उपदेश, ‘देवसवितरेष ते ब्रह्मचारी’ आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरुवात या दृष्टीने गायत्री मंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा, या विश्वाचा मूळ जो प्रजापती त्याला बटू (कुमर) अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारांत परंपरा या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यज्ञोपवित जानवे वगैरे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापती, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे, केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसतो. सर्व सोळा संस्कारांत उपनयन संस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.

  2. 2
    महत्त्व

    शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियांत आणि वैश्यांत करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.

    उपनयन म्हणजे गुरूंच्या जवळ जाणे. गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक होते. त्या नियमांनी स्वत:ला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वत:च्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते. ज्याप्रमाणे कंदिलाच्या बाहेरची काच जर खराब असेल तर दिव्याच्या वातीचे तेज बाहेर नीट पडत नाही; त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ असावी लागते, त्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जातो आणि ज्ञानशक्ती प्रदीप्त होते आणि प्रज्ञेचा विकास होतो. १ भारतीय संस्कृतीत प्रत्येक आश्रमानुसार ब्रह्मचर्याचे स्वरूप वेगवेगळे सांगितले आहे. पण प्रत्येक टप्प्यावर ब्रह्मचर्याचा अभ्यास करीत असताना आपली संयमशक्ती वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यासाठीही योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.[१]

  3. 3
    उपनयनाचा काल

    प्रत्येक वर्णाच्या लोकांना उपनयनाचा काल वेगळा सांगितला आहे. आठ, अकरा व बारा अशा क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना काल सांगितला आहे. अनुक्रमे सोळा, बावीस व चोवीस वयाच्या पुढे तरी उपनयन राहता उपयोगी नाही. (आश्व. १-१९).तरी प्रगत महाराष्ट्रात हा विधी ब्राह्मणांत वयाच्या आठव्या वर्षी, क्षत्रियांत सोळाव्या वर्षापर्यंत, तर वैश्यांमध्ये हा बाराव्या वर्षी करण्याचे संकेत आहेत.

  4. 4
    अधिकारी

    उपनयन करण्यास मुख्य अधिकारी बाप होय. त्यानंतर आजोबा भाऊ, जातीचा कोणी तरी हे होत. ज्याची मुंज करावयाची त्याच्यापेक्षा तो वडील असावा म्हणजे झाले.

  5. 5
    उपनयनकर्ता

    प्राणायाम करावा. इष्टदेवता, गुरु, आईबाप व ब्राह्मण यांस नमस्कार केल्यावर देशकालाचा उच्चार करावा.)
    संकल्प – मला उपनयन संस्कार करण्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी मी तीन कृच्छ्र प्रायश्चित्त व बारा हजार गायत्री जप करीन.

  6. 6
    कुमार

    (केवल आचमन करून) मला इच्छेस वाटेल तसे वागणे, इच्छेस वाटेल तसे बोलणे व इच्छेस वाटेल तसे खाणे वगैरे आचरण करण्यापासून उत्पन्न झालेल्या दोषांचे दूरीकरण होण्यासाठी मी तीन कृच्छ्र प्रायश्चित्त, किंवा त्याच्या प्रतिनिधीभूत द्रव्य देऊन आचरण करीन.

  7. 7
    कर्ता - ह्या कुमाराचे

    १. गर्भाधान, २. पुंसवन, ३. सीमंतोन्नयन, ४. अनवलोभन, ५. जातकर्म, ६. नामकरण, ७. निष्क्रमण, ८. अन्नप्राशन, ९. चौल.

    ह्या नऊ संस्कारांचा कालातिक्रम झाल्याबद्दलचा दोष दूर होऊन श्रीपरमेश्वराची कृपा होण्यासाठी प्रत्येक संस्काराचा

    असे म्हणून एक एक तुपाची आहुती व संस्कारांचा लोप झाल्यामुळे संस्काराला पादकृच्छ, व चौलाबद्दल अर्धकृच्छ्र याप्रमाणे प्रत्यक्श किंवा प्रतिनिधिद्वारे (द्रव्य वगैरे देऊन) प्रायश्चित्त करीन.

    कर्ता – ह्यास द्विजत्व प्राप्त होऊन वेदाध्ययनाचा अधिकार उत्पन्न होण्यासाठी उपनयन संस्कार करीन.
    संकल्प – ह्या कुमाराचे उपनयन करण्याकरिता त्यांचे पूर्वांगभूतकेशवापन करतो.

    नंतर अचार्याने त्या बटूस जवळ घेऊन त्याचे तोंड चांगल्या तर्‍हेने निरीक्षावे आणि स्वतःला नमस्कार करवून त्याला स्वतःच्या मांडीवर बसवावे, व नंतर त्याला आपल्या उजव्या बाजूला बसवावे.

    संकल्प – अमुक नावाच्या कुमाराला द्विजत्व प्राप्त होऊन वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून उपनयन होम करतो.

  8. 8
    वासोधारण

    लंगोटीकरता तिहेरी वळलेला कापसाचा दोरा कंबरेला बांधून लंगोटी घालावी. ‘युवं वस्त्राणि’ ह्या मंत्राचा औचथ्य दीर्घतमा हा ऋषि, मित्रावरुण हे देव, व त्रिष्टुभ् हा छंद होय. वस्त्रधारणाकरिता उपयोग.

    नवे पांढरे वस्त्र नेसवून आणि त्याच मंत्राने नवे पिवळे वस्त्र अंगावर घालावे.
    अजिनधारणम् – मित्रस्य चक्षुः’ ह्या मंत्राचा वामदेव हा ऋषि, अजिन ही देवता आणि त्रिष्टुभ् हा छंद होय. अजिनधारणाकडे उपयोग. वस्त्र किंवा अजिन यापैकी एक घेतले तरी चालते. सध्या दोन्ही घालण्याची चाल आहे.

    अजिन म्हणजे कातडे धारण करवावे.

  9. 9
    यज्ञोपवित धारण

    (गायत्री मंत्र दहा वेळा म्हणून अभिमंत्रित केलेल्या पाण्याने प्रोक्षण करून यज्ञोपवीत धारण करण्याकरिता बटूच्या हातात द्यावे.)

    ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् ।

    आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः ॥३॥

    ॐ यज्ञोपवीत० (३) हा मंत्र कुमाराकडून म्हणवून त्याचा उजवा हात वर करून त्यातून यज्ञोपवीत धारण करवावे.

    मग आपल्या व अग्नीच्या मधून बटूला अग्नीच्या उत्तरेकडे आणुन तेथे आचमन करवून पुन्हा तसेच परत आणून आपल्या उजवीकडे बसविल्यावर

    असे म्हणून प्रायश्चित्ताच्या नऊ आहुती द्याव्यात.

अश्या प्रकारे संक्षिप्त स्वरूपात उपनयन संस्कार संपन्न

    Cart