वैयक्तिक माहिती

वे.मु. अनंत पांडव यांच्या विषयी

वेदमूर्ती अनंत लक्ष्मणराव पांडव गुरुजी हे राज्यातील तरूण ज्योतिषी व वास्तुशास्त्रज्ञ आहेत. या क्षेत्रातील ते एक “ब्रँड” नावच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अनंत पांडव गुरुजी मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत. त्यांचे वडिल लक्ष्मराव पांडव हे प्रख्यात ज्योतिषी. ज्योतिष व वास्तुशास्त्राचे खरे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. पण, गुरूशिष्य प्रणालीतही शिक्षण घेऊन रितसर ते वेदमुर्ती झाले आहेत. यासाठी त्यांनी आैरंगाबादमध्ये  वैदिक शिक्षण घेतले.

वाटचाल

१९९४ते२००५

शिक्षण

वैदिक व इतर शिक्षण

१९९४ते१९९९

वेदपाठशाळा

पर्यंत अनंत पांडव यांनी वेदपाठशाळेत अर्थात श्री.संत ज्ञानेश्वर वेद प्रतिष्ठान औरंगाबाद येथे वे. शा. सं. पंडित दुर्गादासजी मुळे गुरुजी (घानापाठी) यांच्या कडे आपले वेदाचे शिक्षण पूर्ण केले.

१९९९ते२०००

पौरोहित्यास प्रारंभ

अनंत पांडव यांनी सन 2000 मध्ये “पौरोहित्यास”  प्रारंभ केला. सन 2005 साली “जगदंब ज्योतिष” कार्यास त्यांनी प्रारंभ केला होता. सन 1999 साली त्यांनी अखिल भारतीय विश्व वैदिक संमेलन नवी दिल्ली येथे सहभाग नोंदवला होता. यानंतर अनेक संमेलन,सभा,गाजवल्या आहेत.

वैदिक-पौरोहित्य कार्याची आकडेवारी

आजपर्यंत अनंत पांडव यांनी 1500वास्तुशांती केल्या आहेत. 800/850 नवचंडी यज्ञही केलेले आहेत. 35 शतचंडी यज्ञ केले आहेत.सदगुरु अनिरुद्ध बापू यांच्याकडे त्यांनी दत्तयाग केले आहेत. आजपर्यंत अनंत पांडव यांनी दत्तयाग, नवचंडी वास्तुशास्त्रज्ञ म्हणून सल्ले दिले आहेत. या शिवाय त्यांनी रुद्रयाग विष्णुयागही करत असतात. पुणे येथे 108 कुंड महायज्ञ झाला होता. त्यावेळी त्यांनी तेथे मुख्य पौरोहित्यकार म्हणून त्यांची भूमिका बजावली होती.

वैदिक-पौरोहित्य कार्याची आकडेवारी

-संस्कृती संस्कार शिबिर- सन-8/6/97- प्रमाणपत्र- संस्कृती संस्कार शिबिर( श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान, औरंगाबाद)

-शिबिर सहभाग-सन-8/10/ 98-महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानतर्फे श्री-वेद-स्वाध्याय- शिबिर

-वेदशास्त्रात्तेजक सभा – प्रमाणपत्र- वेदाभिज्ञ (माध्यं)

-वेदपाठी उपाधी-सन 3/3/97-श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान, औरंगाबाद)

-सहभाग- सन 7/1/2011- अखिल भारतीय वैदिक संमेलन- 2011-महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान (भारत सरकार,उज्जैन)

-गौरवपत्र-9/1/2011(श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान, औरंगाबाद)

-गौरवपत्र- 22/1/2018 (श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान, औरंगाबाद)

सामाजिक कार्य

वेदमूर्ती अनंत लक्ष्मण पांडव हे शहरातील अवघ्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडींमध्ये भाग घेत असतात. शुक्ल यजुर्वेदीय घनपाठी संमेलनात अनंत पांडव यांनी हिरीरीने भाग घेऊन एक वेगळा ठसा उमटविला होता.

प्रकाशित झालेले

    Cart