माणसाचे जीवन आरोग्यपूर्ण, सुखमय व्हावे, उर्वरित जीवनात शांतता लाभावी म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी वयाच्या ५०व्या वर्षापासून १०० वर्षांपर्यंत वेगवेगळ्या शांती
सांगितलेल्या आहेत. यथाकाळी बाह्मण बोलावून त्या त्या वयानुसार शास्त्रोक्त शांती करून घ्यावी. ही शांती स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कोणाचीही करता येते.
वयाच्या पन्नासाव्या वर्षी – वैष्णवशांती
वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी – वारुणी शांती
वयाच्या साठाव्या वर्षी – उग्ररथ शांती
वयाच्या पासष्टाव्या वर्षी – मृत्युंजय महारथी शांती
वयाच्या सत्तराव्या वर्षी – भौमरथी शांती
वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी – ऐंद्री शांती
वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतर – सहस्रचंद्रदर्शन शांती
सहस्रचंद्रदर्शन म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात किती पौर्णिमा पाहिल्या आहेत, म्हणजे किती पौर्णिमा होऊन गेल्या आहेत, त्यानुसार त्यांना चंद्राचे हजार वेळा दर्शन झाले आहे.
तसा हिशेशोब करता ८० वर्षांत दरसाल १२ प्रमाणे होतात ९६०, अधिक महिने येतात २७ म्हणजे ते झाले २७ एकंदर झाल्या ९८७, तर १०००ला कमी पडतात
१३. म्हणून ८१ वर्षे १ महिन्यानंतर सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा.
वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी – रौद्री शांती
वयाच्या नव्वदाव्या वर्षी – कालस्वरूप रौद्री शांती
वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी – त्र्यंबक मृत्युंजय शांती
वयाच्या शंभराव्या वर्षी – त्र्यंबक महामृत्युंजय शांती