वे.मु. अनंत पांडव गुरुजी

नक्षत्र शांती

नक्षत्र शांती:  जन्मदिवसापासून १२ व्या दिवशी अथवा शुद्ध अग्नी असलेल्या दिवशी मातापित्यांनी मुलांचे अरिष्ट निवारण्यासाठी शांती करून घ्यावी. शांतीचे विविध प्रकार व त्याचे दोष:

१.     पुष्य नक्षत्राचे २ रे व ३ रे चरण अनिष्ट, पिता, भाऊ, स्वत:स अनिष्ट, म्हणून गोदानासह शांती करावी.

२.     आश्लेषा नक्षत्र मातापित्यास, सासूस अनिष्ट  व धनक्षय होतो, शांती करावी.

३.     मघा नक्षत्र १ ले चरण अनिष्ट  आरोग्यप्राप्तीसाठी शांती करावी.

४.     उत्तरा नक्षत्र १ ले चरण अनिष्ट   स्वत:ला, वडील, भाऊ यांना अनिष्ट   शांती करावी.

५.     विशाखा नक्षत्र ४ थे चरण अनिष्ट   बायकोचा भाऊ, दीर यांना अनिष्ट  शांती करावी.

६.     चित्रा नक्षक्षत्राचा पूर्वाध अनिष्ट   वडील, भाऊ, स्वत:स अनिष्ट शांती करावी.

७.     ज्येष्ठा नक्षत्र  शांती वडील, भाऊ, दीर, ननंद, सासरा, मेहुणा यांना अनिष्ट  शांती करावी.

८.     मूळ नक्षत्र  वडील, सासरा, आई, स्वत: यांना अनिष्ट  शांती करावी.

९.     पूर्वा नक्षत्र ३ रे चरण  अनिष्ट   वडील, भाऊ,  व स्वत: यांना अनिष्ट  शांती करावी.

१०.    योग, व्यतिपात व वैधृति योग शारीरिक व्याधी स्त्रियांना शोक प्राप्त होतो धननाश होतो शांती करावी.

११.    अतिगंड व गंडयोग या योगावर जन्म झाला असता आयुष्यवृद्धीसाठी शांती करावी भद्रा (विष्टी करण) आरोग्यप्राप्तीसाठी शांती करावी.

१२.    दुग्धयोग, मृत्युयोग आयुष्यवृद्धीसाठी रुद्राभिषेक व शांती करावी.

१३.    कृष्ण चतुर्दशी (अमावास्या) या तिथीला जन्म झाला असता शांती करावी.

१४.    त्रिकप्रसव शांती:

तीन मुलांनंतर मुलगी अथवा तीन मुलींनंतर मुलगा झाल्यास अनिष्ट निवृत्तीकरिता तसेच त्या जातकाला उत्तम आरोग्य प्राप्तीकरिता त्रिकप्रसव शांती करावी.

१५.    यमलजनन शांती-

मातेच्या उदरामध्ये जुळ्या जातकांचा जन्म झाल्यास त्या बालकाचे व बालकाच्या मातेचे आरोग्य उत्तम प्राप्तीकरिता यमलजनन शांती करावी.

    Cart