वे.मु. अनंत पांडव गुरुजी

रूद्राक्ष

जे रडणार्‍याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेल रुद्र ± अक्ष’ या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे.

अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ± अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, (उदा. तिसरा डोळा) तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.
रुद्र म्हणजे रडका. ‘अ’ म्हणजे घेणे आणि ‘क्ष’ म्हणजे देणे; म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची किंवा देण्याची क्षमता.
रुद्रवृक्ष (रुधिरवृक्ष, रुद्राक्षवृक्ष)
एकमुखी रुद्राक्ष— ही रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचे रूप समजला जातो. ही ज्याच्याजवळ असेल त्याला शत्रू असत नाहीत. व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते असे म्हणतात.
दोनमुखी रुद्राक्ष— हा रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते.
तीनमुखी रुद्राक्ष— अग्नीरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही असे म्हणतात.
चारमुखी रुद्राक्ष — याच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही असे म्हणतात.
पाचमुखी रुद्राक्ष— हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यु येत नाही
सहामुखी रुद्राक्ष— कार्तिकेय स्वरूपात याची गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो.
सप्तमुखी रुद्राक्ष— याच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात.
अष्टमुखी रुद्राक्ष— याला गणेश रूप मानून कार्यसिद्धीसाठी याची पूजा केली जाते.
नऊमुखी रुद्राक्ष— काळभैरवाचे स्वरूप समजून बाधा, पीडा, टळावी म्हणून याची पूजा केली जाते.
दहामुखी रुद्राक्ष— जनार्दन स्वरूपात याची गणना होते.
अकरामुखी रुद्राक्ष— याच्या पूजनाने इंद्रदेवता व अकरा रूद्र प्रसन्न होतात.
बारामुखी रुद्राक्ष— सूर्यस्वरूपी या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात.
तेरामुखी रुद्राक्ष— याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते.
चौदामुखी रुद्राक्ष— रोगनिवारण होऊन इच्छा पूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात.
पंधरावा गौरीशंकर रुद्राक्ष— एकाच देठावर दोन मणी काही वेळा सापडतात, किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात, त्यांना ब्रम्हा, विष्णू, महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते.

    Cart