वे.मु. अनंत पांडव गुरुजी

श्री यंत्र

मेरू श्रीयंत्र स्थापना आपल्याला व्यापारवृध्दी, ॠणमोचन, संतान लाभ, अखंड संपत्ती, दरिद्रता नाश, भौतिक सुख संपदा आणि उत्तम आरोग्य प्रदान करते. अत्यंत प्रभावी आशा मेरू श्रीयंत्रामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते.

सर्वप्रकारचे भय नाहीसे होते. विद्या, शक्ती, यश, मानसन्मान, अष्टएैश्र्वर्य आणि सकल समृद्धीची पाप्ती होते.

श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटातुन मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा कालयुगातील राजमार्ग आहे. या

मेरू श्रीयंत्राची उपासना स्त्री, पुरुष, विद्यार्थी आपल्या इच्छीत मनोकामना पुर्तीकरिता करू शकतात.

मेरू श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्री महालक्ष्मीचे स्वरूप आहे. जे व्यक्ती आपल्या वास्तु, दुकान, फॅक्टरी, ऑफीसमध्ये मेरू श्रीयंत्राची स्थापना करतो त्याला साक्षात अष्टलक्ष्मी प्राप्त होते. या मेरू श्रीयंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्य रेषा, त्रिकोन, वर्तुळे, अष्टदल, बीजयंत्राच्य विविध रचना असतात. हे मेरू श्रीयंत्र भगवती ललीता महात्रिपुरा सुंदरीचे निवास स्थान आहे .(संदर्भ : ब्रहह्याण्ड पुराण )

  1. 1
    श्री यंत्र कथा

    श्रीयंत्र हे त्रिपुराशक्तीचे प्रतीक आहे. भगवती, श्रीविद्या, त्रिपुरासुंदरीच्या साधनेमध्ये श्रीयंत्र हे एक अत्यंत प्रभावी उपयोगी यंत्र आहे. किंबहुना श्रीयंत्राशिवाय श्री लीलता महात्रिपुरासुंदरी देवतेच्या साधनेचे उत्तम फळ मिळू शकत नाही. ब्रह्माण्ड पुराणातील उल्लेखाप्रमाणे जिच्या गर्भामध्ये ३३ कोटी देवदेवताचा वास आहे अशा श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवीचे श्रीयंत्र हे निवासस्थान आहे. ती त्या निवासस्थानामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती परब्रह्म, परविष्णू परशिवासहित निवास करते. म्हणूनच श्रीयंत्राची पूजा करणार्‍यास विश्‍वातील समस्त देवदेवतांची पूजा केल्याचे पुण्य लाभते व त्याला सर्व स्तरांवरील समृद्धी प्राप्त होते.
    श्रीयंत्रात अत्यंत अद्भुत तर्‍हेने संपूर्ण ब्रह्माण्डाची संरचना करण्यात आली आहे. याकरिता विशिष्ट पद्धतीचा वापर करून अनेक भौमितिक रचना एकमेकांत गुंफण्यात आल्या आहेत. या यंत्रातील ९ चक्रे ही मनुष्य देहांतील, ९ आध्यात्मिक चक्रासमान आहेत. यामुळे अनेक साधनांचे पुण्य या एकाच श्रीयंत्र साधनेमुळे प्राप्त होते. श्रीयंत्राचे मनोहर रूप न्याहाळताना जाणवते की याच्या मधोमध एक बिंदू आहे आणि सर्वांत बाहेरच्या बाजूला भूपूर आहे. भूपुराच्या चारी बाजूंना चार द्वारे असतात., बिंदूपासून जर विचार केला तर तेथपासून भूपुरापर्यंत एकूण त्याचे दहा विभाग असतात ते अशाप्रकारे. १) केंद्रबिंदू (सर्वानंदमय चक्र), २) त्रिकोण (सर्वसिद्धिपद चक्र), ३) आठ त्रिकोण (सर्वरक्षक चक्र), ४) दहा त्रिकोण (सर्वरोगहर चक्र – अन्तर्दशार), ५) पुन: दहा त्रिकोण (सर्वार्थसाधक चक्र – बीहर्दशार), ६) चौदा त्रिकोण (सर्वसौभाग्यदायक चक्र – चतुर्दशार), ७) आठ पाकळ्यांचे कमळ (सर्वसंभोक्षण चक्र – अष्टदल, ८) सोळा पाकळ्यांचे कमळ (सर्वाशापरीपूरण चक्र – षोडशदल), ९) तीने वृत्ते (त्रैलोक्यमोहन चक्र), १०) तीन भूपूर (भूपूरचक्र).
    श्रीयंत्रातील रचना एकानंतर एक अशा जोडलेल्या असतात त्यामुळे सहजच कोन व रेषा तयार होतात. चतुर्दशार कोनांची टोके बाहेरील अष्टदलाला जोडलेली असतात. अष्टदलांची टोके षोडसदलाबरोबर व षोडसदलाची टोके प्रथम वृत्ताला मिळालेली असतात. या कारणामुळे आणखी कितीतरी कोन तयार होतात ज्याला ‘स्पंदीचक्र’ असे म्हणतात. यामध्ये बिंदू अष्टदल, त्रिवृत्त आणि चतुरस्त्र यांना शिवाचा अंश मानतात आणि त्रिकोण, अष्टकोन, दोन दशकोन आणि चतुर्दशारला शक्तीचा अंश मानले आहे. बाहेरच्या बाजूला जे भूपूर आहे ते एक प्रकारचे तटकुंपण किंवा किल्ल्यासारखे दिसते. अशा प्रकारे श्रीयंत्राची रचना अतिशय मनोहर तरीही गहन आहे.
    श्रीयंत्र प्रतिमेची पौराणिक कथा अशी – एकदा लक्ष्मी अप्रसन्न होऊन पृथ्वीवरून वैकुंठाला निघून गेली त्यामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या. वसिष्ठऋषींनी लक्ष्मी मातेला पृथ्वीवर आणण्याचा निश्‍चय करून ते वैकुंठाला पोहोचले पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले नंतर वसिष्ठमुनींनी तपश्‍चर्येला प्रारंभ केला व श्रीमहाविष्णूंना आवाहन केले. श्रीमहाविष्णू प्रकट झाले. श्रीविष्णूंनी वसिष्ठमुनींसह महालक्ष्मीच्या आलयामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी तिची प्रार्थना केली; परंतु देवीने आपला तोच पृथ्वीवर न जाण्याचा आग्रह धरून ठेवला. वसिष्ठमुनी खिन्न मनाने पृथ्वीवर परतले. सगळ्यांच्या समोर त्यांनी एक गोष्ट प्रतिपादन केली ती म्हणजे आता श्रीयंत्र निर्मितीशिवाय मार्ग उरलेला नाही. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आश्रमामध्ये दीपावलीमधील धनत्रयोदशीला विधिपूर्वक श्रीयंत्र प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली. या श्रीयंत्र प्रतिमेच्या निर्मितीचे ज्ञान आणि उपासनाक्रम मुख्य गुरू बृहस्पतींनी वसिष्ठ ऋषींना दिग्दर्शित केले. त्यांच्या निर्देशानुसार श्रीयंत्र प्रतिमा तयार झाली. प्रतिमेची शोडषोपचारे पूजन होताच श्रीलक्ष्मी आपल्या सर्व सिद्धीसह त्या श्रीयंत्र सिंहासनावर प्रकट झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिला व ती म्हणाली की आपण जो श्रीयंत्र प्रयोग केला त्याने मी प्रभावित झाले असून या श्रीयंत्रामध्ये मी अखंड वास करेन. ज्या साधकाच्या वास्तूमध्ये श्रीयंत्राची विधिवत स्थापना करण्यात येते त्या साधकाने व घरातील सर्वांनी श्रीयंत्राची समाराधना प्रेमपूर्वक भक्तियुक्त अंत:करणाने करावी. प्रात:काली स्नानादी कर्मे पार पाडून शूचिर्भूत होऊन श्रीयंत्रप्रतिमेसमोर नंदादीप लावून आसनस्थ व्हावे. न्यास, संकल्प ध्यानाचे श्‍लोक म्हणून श्रीयंत्राची पंचोपचारे पूजा करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्र पाठाने श्रीयंत्रप्रतिमेवर कुंकुमार्चन करावे. तद्नंतर बीजमंत्राचा जप करावा. जप पूर्णतेनंतर आरती व क्षमा प्रार्थना म्हणावी. सायंकाळीसुद्धा धूप-दीप प्रज्वलित करून प्रात: पूजेप्रमाणेच समाराधाना करावी.

    श्रीयंत्रप्रतिमेला नित्य स्नानविधी अभिषेक नाहीत, फक्त शुद्ध जलाने पौर्णिमेच्या दिवशी शूचिर्भूततेने ललितासहस्रनाम स्तोत्र पाठाने त्या प्रतिमेला अभिषेक करावा व तद्नंतर पंचोपचारे पूजा करून ललितासहस्रनाम स्तोत्र पाठाने कुंकुमार्चना करावे. ज्या वास्तूमध्ये श्रीयंत्र स्थापना तसेच श्रीललितासहस्रनाम स्तोत्राचा पाठ वाचला जाऊन कुंकुमार्चना होते त्या वास्तूमध्ये श्रीललिता महात्रिपुरासुंदरी देवतेचा नित्य वास असतो हे पक्के धानात ठेवावे. श्रीयंत्र स्थापना आपल्याला व्यापारवृद्धी, ऋणमोचन, संतानलाभ, अतूट संपत्ती, दरिद्रता नाश, भौतिक सुखसंपदा आणि अद्भुत ऐश्‍वर्यासिद्धी प्रदान करते.
    अत्यंत प्रभावी श्रीयंत्रामुळे घरात समृद्धी नांदते. सर्व प्रकारचे भय नाहीसे होते. विद्या, शक्ती, यश, मानसन्मान, ऐश्‍वर्य आणि सकलसमृद्धी प्राप्त होते. श्रीयंत्र म्हणजे सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे. अखंड पंचधातूमधील अनेक वजनांमधील श्रीयंत्रे उपलब्ध आहेत. प्रात: पूजेमध्ये व सायंकालीन पूजेमध्ये श्रीयंत्र प्रतिमेला कोणत्याही प्रकारचे अभिषेक करू नयेत. नित्य सहस्रनामाने कुंकुमार्चना हेच तिचे अभिषेक होय.

    Cart