हा संस्कार गर्भाधान झाल्यानंतर तिसNया महिण्यामध्ये करावा हा संस्कार केल्याने गर्भबिजासंबंधी सर्व दोष दूर होवून गर्भ सशक्त होतो.
गर्भाच्या अवयवाची वृध्दी होण्याकरीता व गर्भावर उत्तम संस्कार, तसेच सकल पाप, दुर होवून या गर्भबिजास उत्तम संस्कार होण्याकरीता हा संस्कार करावा.
बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्माच्या वेळेस गर्भामध्ये बालकाने जलपान केलेल्या दोषापासून निवृत्ती मिळण्याकरीता व आयुष्य बुध्दी यांची वृध्दी होवून बिज आणि गर्भ या पासून उत्तपन्न झालेल्या पापांचा नाश होवून परमेश्वराच्या प्राप्तीकरता जातकर्मा नावाचा संस्कार केला जातो.
बालकाच्या बिज व गर्भ यापासून उत्तन्न झालेल्या सर्व प्रकारचे पाप दुर होवून त्याची आयुष्याची वृध्दी व व्यवहारीक सिध्दीकरीता व परमेश्वराच्या प्राप्तीकरीता बालकाचे मासनाम नक्षत्र नाव कुलदेवता नाम व व्यवहारीक नाम असा क्रम करुन नामसंस्कार करावा.
बालकाच्या आयुष्य व उत्तम शरीर क्रांती करीता जन्म झाल्यानंतर सव्वा महिण्यानंतर शुभ दिवशी परमेश्वराच्या दर्शनाकरीता बालकाला घेवून जावे.
बालक मातेच्या गर्भात असताना, अमंगल पदार्थाच्या सेवनाने आलेली अशुध्दता दुर होण्यासाठी अन्नग्रहण करण्याचे सामथ्र्य, ब्रम्हतेज, इंदियपृष्ठी, आयुष्य, बल, मिळवण्यासाठी व बिज गर्भापासून उत्पन्न झालेल्या पापांच्या निवृत्ती करीता बालकाला पंचरसाचा स्वाद दयावा त्यामध्ये प्रथम सुवर्णपात्रामध्ये कडू, तिखट, आंबट, खारट, तुरट व गोड पदार्थ आईच्या मांडीवर बसून सोन्याच्या चमच्याने बालकाला विधिवते प्राषण करावे.
बालकाचे बिज व गर्भ यापासून उत्पन्न होणारा दोष नष्ट होवून बल, आयुष्य, तेज यांची वृध्दी होवून व्यवहारीक दृष्टया उत्तम पक्व, बल सिध्द होण्यासाठी चुडाकरण नावाचा संस्कार केला जातो.
मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवित (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटूला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.
उपनयन झाल्यानंतर बालकाला (त्या ब्रम्हचार्याला) आपल्या स्वशाखिय चार वेदांपैकी जये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्वेद हे शिक्षण गृहण करण्याचा अधिकार प्राप्त होतो आजच्या कालाप्रमाणे उपनयन संस्कारानंतर शालेय शिक्षण आरंभ केल्यास त्या बालकाचे गायत्री मंत्र उपदेशानंतर अतिशय तेजस्वी व प्रखर बुध्दीमत्ता प्राप्त झाल्याने उत्तम शिक्षण पूर्ण होते.
विवाहापूर्वी समावर्तन नावाचा (सोडमुंज) हा विधि केला जातो. ब्रम्हचर्य आश्रम सोडून ग्रहआश्रम प्राप्तीसाठी हा समावर्तन नावाचा संस्कार केला जातो.