रुद्राक्षमाला गळ्यात इत्यादी धारण करून केलेला जप रुद्राक्षमाला धारण न करता केलेल्या जपाच्या सहस्र पटीने लाभदायक असतो, तर रुद्राक्षाच्या माळेने केलेला जप इतर कोणत्याही प्रकारच्या माळेने केलेल्याच्या दहा सहस्र पट लाभदायक असतो; म्हणूनच रुद्राक्षमाळेने मंत्र जपल्याविना किंवा धारण केल्याविना शीघ्र सिद्धी प्राप्त होत नाही, रुद्राक्षमाळेचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी ती गळ्याजवळ दोर्याने तिचा गळ्याला अधिकाधिक स्पर्श होईल अशी बांधावी.
आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्णवीर्य व आयूकफनाषक आहे.त्याचा रक्तदाबाच्या (ब्लड प्रेशरच्या) रोग्याला उपयोग होतो असे म्हणतात रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालावयाचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात. योगी लोकांच्या मते प्राणतत्त्व (किंवा विद्युत शक्ती) निमय करणारी शक्ती रुद्राक्षात (रुद्राक्ष मालेत) असते. रुद्राक्ष मालेने मंत्रसाधकाला मन:शक्तीवर नियंत्रण साधता येते.
Reviews
There are no reviews yet.